पुण्यात पुन्हा थरार! आंदेकर टोळीचा बदला घेत खून
पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी टोळींचा थरार पाहायला मिळाला. कोंडवा भागात शनिवार, १ नोव्हेंबर रोजी गणेश काळे या तरुणावर भररस्त्यावर गोळ्या झाडून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार करत घटनास्थळावरच ठार केलं.
पोलिस तपासानुसार ही हत्या आंदेकर टोळीने माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाच्या बदल्यात केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृत गणेश काळे हा या प्रकरणात आरोपी असलेल्या समीर काळेचा सखा भाऊ असल्याचं पोलिसांना समजलं आहे.
घटना कशी घडली?
शनिवारी दुपारी साधारण तीन वाजताच्या सुमारास कोंडव्यातील खडी मशीन चौक येथे गणेश काळे आपल्या रिक्षामध्ये जात असताना, दोन बाईकस्वारांनी त्याच्या रिक्षाच्या समांतर येत त्याच्यावर गोळ्या झाडल्या. दोन गोळ्या लागल्यानंतर आरोपींनी त्याला बाहेर खेचून कोयत्याने वार केले आणि पळ काढला.
गँगवॉरचा अंगल — आंदेकर विरुद्ध कोमकर टोळी
या घटनेनंतर पुन्हा एकदा पुण्यातील आंदेकर विरुद्ध कोमकर टोळी युद्ध चर्चेत आलं आहे. याच टोळ्यांमधील वादातूनच वनराज आंदेकर यांची २०२४ मध्ये हत्या झाली होती. त्या खुनात गणेश काळेच्या भावाचा सहभाग होता, त्यामुळे ह्या हत्येला बदल्याचा रंग चढल्याचं पोलिसांना वाटतं.
मागचा पॅटर्न कायम
आंदेकर टोळीवर "बदल्याचा पॅटर्न" कायम ठेवण्याचा आरोप आहे. आपल्या सदस्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पुन्हा एकदा रक्तपात घडवल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. काही सूत्रांनी मात्र पैशांच्या वादातून ही हत्या झाली असावी, असंही सांगितलं.
पोलिस तपास सुरू
कोंडवा पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून, आंदेकर टोळीच्या उरलेल्या सदस्यांचा शोध सुरू आहे.
या घटनेनंतर पुण्यात पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की “आंदेकर पॅटर्न” पुन्हा परतलाय का?
#PuneCrimeNews #AndekarToli #GaneshKaleMurder #VanrajAndekar #PuneGangwar #MaharashtraNews पुणे खून बातमी, आंदेकर टोळी, Pune Gangwar 2025, Ganesh Kale Murder, Vanraj Andekar Case, Pune Crime News, कोमकर टोळी, Pune Kondhwa Murder, Maharashtra Crime, Gangster News Pune
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: