test

मुंबईत महाविकास आघाडीचा शक्तीमोर्चा! राज ठाकरेंचा आक्रमक सूर

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा नेताना मुंबईत महाविकास आघाडीचा शक्तीमोर्चा

मुंबईत महाविकास आघाडी आणि मनसेचा शक्तीमोर्चा!

मुंबईत आज महाविकास आघाडी (MVA) आणि मनसे यांच्या नेतृत्वाखाली मोठा शक्तीमोर्चा निघाला. या मोर्च्याने महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडवली आहे. फॅशन स्ट्रीटपासून मनपा भवनापर्यंत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते.

राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा आक्रमक सूर लावत दुबार मतदार प्रकरणावर तीव्र टीका केली. त्यांनी पुरावे सादर करत निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधला. "मतदार याद्या स्वच्छ झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत," असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा नेताना मुंबईत महाविकास आघाडीचा शक्तीमोर्चा
मुंबईत महाविकास आघाडीचा मोर्चा — राज, उद्धव, पवार एकत्र.

या मोर्च्यात उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले. पवारांच्या तब्येतीची पर्वा न करता त्यांनी काही अंतर चालत सहभागी होऊन भाजपच्या टीकेला उत्तर दिलं.

निवडणूक आयोगावर सातत्याने आरोप

उद्धव ठाकरे यांनी देखील मतदार याद्यांतील गोंधळावर प्रश्न उपस्थित केला. "माझं नाव अर्ज केल्याशिवाय लिस्टमध्ये आलं, मग सर्व काही नीट आहे का?" असा सवाल त्यांनी केला.

भाजपचा "मुक मोर्चा"

भाजपने या मोर्च्याला "पराभूत मानसिकतेचा मोर्चा" म्हणत हेटाळणी केली. मात्र, विरोधकांनी सांगितलं की हा मोर्चा लोकशाही वाचवण्यासाठी आहे.

राजकीय निरीक्षकांच्या मते, हा मोर्चा निवडणुकीपूर्वीची "कुस्तीपूर्वीची खडाखडी" आहे. महाविकास आघाडी आणि मनसेची एकजूट निवडणुकांपर्यंत टिकेल का, हा पुढचा प्रश्न आहे.

लोकांच्या प्रतिक्रिया

तुम्हाला काय वाटतं? विरोधकांची एकजूट टिकेल का? मतदार याद्या खरंच "मॅच फिक्सिंग" आहेत का? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

#राजकारण #महाविकासआघाडी #राजठाकरे #मुंबईमोर्चा #MVA #MaharashtraPolitics मुंबई मोर्चा 2025, महाविकास आघाडी बातमी, राज ठाकरे मोर्चा, उद्धव ठाकरे न्यूज, मनसे मोर्चा, MVA Rally Mumbai, Maharashtra Politics, Election Commission Controversy

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.