मुंबईत "सत्याचा मोर्चा" — राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा निवडणूक आयोगावर थेट हल्ला
मुंबई, १ नोव्हेंबर —
मतदार याद्यांमधील सदोष नावे, दुबार नोंदणी आणि वोट चोरी या मुद्यांवर महाविकास आघाडी आणि मनसेने शनिवारी "सत्याचा मोर्चा" काढला. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे तीघे नेते एका मंचावर एकत्र आले आणि निवडणूक आयोगावर थेट आरोप केले की "महाराष्ट्रात लोकशाहीच्या नावाखाली मतदान फिक्स झालं आहे".
राज ठाकरे लोकलने चर्चगेट स्टेशनवर पोहोचले आणि फॅशन स्ट्रीट वरून मोर्चाला सुरुवात झाली. राज ठाकरेंनी थेट दुबार मतदारांची यादी वाचून दाखवली आणि निवडणूक आयोगाकडे प्रश्न उभा केला — “जर सगळ्यांनाच माहिती आहे की दुबार मतदार आहेत, तर आयोग कशासाठी गप्प बसलाय ?”
राज ठाकरेंनी सादर केलेले आकडे
राज ठाकरेंच्या मते मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये सुमारे ४.५ लाख दुबार मतदार नोंदवले गेल्याचे पुरावे त्यांनी सादर केले. त्यात मुंबई नॉर्थ ईस्ट मध्ये ९२,९८३ दुबार नावे तर मुंबई साऊथ मध्ये ५५,२०५ दुबार नावे असल्याचा आरोप केला.
उद्धव ठाकरे म्हणाले – “ही ठिणगी वणवा होऊ शकते !”
उद्धव ठाकरे म्हणाले की, "मतचोरी करणाऱ्यांना ही फक्त ठिणगी आहे, पण ही ठिणगी वणवा होऊ शकते. सरकार आणि आयोग गप्प बसले तर जनतेचा राग ओसंडून वाहेल.” त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर थेट आरोप केले की, “मतचोरी स्वतः मुख्यमंत्री मान्य करतायत का ?”
शरद पवार – “संयुक्त महाराष्ट्राची आठवण झाली”
शरद पवारांनी या मोर्चाला "लोकशाही वाचवण्याचा संघर्ष" असं संज्ञा दिलं. ते म्हणाले, “आमचे विचार वेगळे असले तरी लोकशाही वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे.”
महाविकास आघाडीच्या मागण्या
-
मतदार याद्या अद्ययावत करणे
-
दुबार नावे काढून टाकणे
-
मतदार याद्या अपडेट होईपर्यंत निवडणुका न घेणे
-
मतदार नोंदणी ७ नोव्हेंबर पर्यंत वाढवणे
मोर्च्यातील घटनाक्रम
राज ठाकरे, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आदी नेते मोर्च्यात सहभागी झाले. मोर्चा मुंबई महापालिकेपर्यंत गेला आणि नेत्यांच्या भाषणांनी परिसर दुमदुमला.
निष्कर्ष
राज ठाकरेंच्या पुराव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाने यावर काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. "सत्याचा मोर्चा" राजकीय दृष्ट्या ऐतिहासिक ठरण्याची चर्चा राजकारणात पुन्हा चालू झाली आहे.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: