रोहित आर्य, पवई एनकाउंटर, Powai Encounter, Rohit Arya News, Mumbai Police Encounter, Rohit Arya History,
दिनांक 4 ऑक्टोबर 2025
मुंबईतल्या पवई परिसरातल्या राज स्टुडिओमध्ये घडलेला रोहित आर्यचा एनकाउंटर सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. 17 लहान मुलांना ओलीस ठेवून ठेवणाऱ्या रोहित आर्यचा पोलिसांनी चकमकीत खात्मा केला, अशी अधिकृत माहिती पोलिसांनी दिली आहे.
काय घडलं पवईमध्ये?
गुरुवारी दुपारी पवई पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की राज स्टुडिओच्या महावीर बिल्डिंगमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
रोहितकडे एअरगन होती आणि त्याने खोलीच्या खिडक्यांना सेन्सर लावले होते, ज्यामुळे आत प्रवेश करणे कठीण झाले होते.
सहायक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ऑपरेशन सुरू केले. पोलिसांनी बाथरूमच्या मार्गाने खोलीत प्रवेश करून मुलांची सुटका केली. या वेळी झालेल्या चकमकीत पोलिसांच्या गोळीबारात रोहित आर्यचा मृत्यू झाला.
17 मुलांची सुटका
या कारवाईत पोलिसांनी सर्व 17 मुलांना सुरक्षित वाचवलं. मात्र, या दरम्यान एक महिला आणि एक लहान मुलगी जखमी झाली. पोलिस हवालदार शिवाजी सावंत यांनी जखमी महिलेला वाचवलं, अशी माहिती समोर आली आहे.
रोहित आर्यचा भूतकाळ
रोहित आर्य हा पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचा संस्थापक होता. 2013 साली गुजरातमध्ये त्याने “लेट्स चेंज” मोहिम सुरू केली होती, ज्याचं कौतुक नरेंद्र मोदींनी स्वतः केलं होतं.
नंतर महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्येही हा प्रकल्प सुरू करण्यात आला. तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रोहितला वैयक्तिक मदतही केली होती.
आर्थिक वाद आणि आंदोलन
2024 मध्ये रोहितने शिक्षण विभागावर कामाचे पैसे न दिल्याचा आरोप केला होता. त्याने उपोषण सुद्धा केलं होतं. दीपक केसरकर यांनी वैयक्तिक मदतीचे दोन चेक दिल्याचं समोर आलं, पण पूर्ण रक्कम मिळाली नाही असा आरोप रोहितने केला होता.
सरकार आणि पोलिसांची भूमिका
घटनेनंतर शालेय शिक्षण विभागाशी संबंधित प्रश्नही उपस्थित झाले. काँग्रेस नेते विजय वडेटवार यांनी विचारलं की, जर रोहित मानसिकदृष्ट्या अस्थिर होता, तर त्याला शासकीय प्रकल्पांची जबाबदारी कशी देण्यात आली?
सरकार सत्य लपवतंय का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
चौकशीचा पुढचा टप्पा
आता पोलिसांची चौकशी सुरू आहे. रोहित आर्य राज स्टुडिओमध्ये मुलांना का बोलावलं? त्याचा उद्देश काय होता? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही दिवसांत मिळतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: